Ad will apear here
Next
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी

भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.
................................
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!
नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी!
तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला 
अगे भक्तिसोपान सोपा भला
दुजा वेद तूं! धन्य तूं वैखरी!
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!

प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें
मराठी स्वराज्या असे स्थापिलें
अशी धन्य तूं वीरधात्री खरी! 
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!

तुझी माधुरी मोदमात्रावहा
फुलांनी, मुलांनी खुले गे अहा!
कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी!
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!

तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा
नमो कृष्ण-रामा नमो भास्करा
तुझे लाडके हे धरावे शिरीं
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!
- रा. अ. काळेले
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZOECJ
Similar Posts
मराठीची लिपी मराठीची लिपी म्हणून, बोली म्हणून असलेली वैशिष्ट्यं सांगणारी ‘आमुची लिपी’ ही कविता आज पाहू या. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी ती लिहिली आहे.
माझी बोली असे मराठी मराठी बोली अन् भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ‘माझी बोली असे मराठी’ ही मा. रा. पोतदार यांची कविता आज पाहू या...
माझ्या मराठीची गोडी ‘जिची थोरवी दररोज नवे रूप दाखवते आणि जिच्यासमोर आपोआप नतमस्तक व्हायला होतं,’ असं म्हणणारी वि. म. कुळकर्णी यांची ‘माझ्या मराठीची गोडी’ ही कविता आज पाहू या.
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language